Sunday, December 3, 2023
Homeमहाराष्ट्रचिखली - तळवडे रस्त्यांच्या आगाऊ ताब्यासाठी दि.२६ व २७ ऑक्टोबर रोजी नगररचना...

चिखली – तळवडे रस्त्यांच्या आगाऊ ताब्यासाठी दि.२६ व २७ ऑक्टोबर रोजी नगररचना विभागाकडून शिबीराचे आयोजन

चिखली व तळवडे भागातील ७ रस्त्यांच्या आगाऊ ताब्यासाठी महापालिका नगररचना विभागाकडून दि. २६ व दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली. 

 वर्षभर चिखली व तळवडे भागातील ७ रस्त्यांचे आगाऊ ताब्यासाठी स्थानिक  लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी मनपातर्फे दि. २६ व दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चिखली गावठाणमधील मनपा शाळा मुले व मुली तसेच तळवडे गावठाणमधील मनपा शाळा मुले व मुली येथे शिबिराचे आयोजन केले आहे. 

मौजे चिखली व तळवडे येथील मंजूर विकास योजनेतील खालीलप्रमाणे ७ रस्त्यांच्या आगाऊ ताब्याची कार्यवाही भूसंपादन कायदा २०१३ अन्वये जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फत सुरू आहे. तर काही रस्त्यांची भूसंपादनाची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे. 

चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा १२ मी/१८ मीटर रुंद डी.पी. रस्ता (रस्त्याची लांबी १३७० मीटर). २) चिखली येथील साने चौक ते चिखली गाव १२ मी, २४ मी व ३० मी रुंद रस्ता (रस्त्याची लांबी २०३० मीटर). ३) चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३० मी रुंद डी. पी. रस्ता (रस्त्याची लांबी २२५० मीटर). ४) चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४ मी रुंद रस्ता (रस्त्याची लांबी २००० मीटर). ५) तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मी रुंद उर्वरित रस्ता (रस्त्याची लांबी ४०० मीटर). ६) तळवडे येथील तळवडे कॅनवे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मी डी.पी. रस्ता (रस्त्याची लांबी १९५० मीटर). ७) तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा १२.००मी रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील २४.०० मी. रस्ता (रस्त्याची लांबी २१०० मीटर). या रस्त्यांच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. 

*प्रशासनाचे आवाहन…* 

रस्ता बाधित मिळकतधारकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे टी.डी.आर. / एफ.एस.आय. चे बदल्यात आगाउ ताबा देणेसाठी ७/१२ उतारा व मोजणी झाली असल्यास मोजणी नकाशा सोबत आणावा व रु. १००/- प्रपत्र शुल्क भरावेत. आपली जागा रस्त्याने बाधित होत असल्याची खात्री झाल्यानंतर जागेवरच प्रपत्र ‘अ’ व ‘ब’ देणेत येईल. आपला टी.डी.आर./ एफ.एस.आय. चा रितसर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार टी.डी.आर./ एफ.एस.आय. मनपाकडून देण्यात येईल. भूसंपादन कायद्यान्वये निवाडा जाहीर झाल्यास टी.डी.आर. / एफ.एस.आय. ला पर्याय उपलब्ध राहणार नाही. त्यानंतर केवळ भूसंपादन कायद्यानुसार मिळणारा मोबदला देय होईल. 

चिखलीतील रस्तेबाधित मिळकतधारकांनी श्री. बनपट्टे : 9922502240 आणि तळवडेतील रस्तेबाधित मिळकतधारकांनी श्री. गवळी : 9423506531 यांना संपर्क करावा, असे आवाहन नगररचना विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments