१४ वर्षाखालील जिल्हा क्रीडा बुद्धिबळ स्पर्धेत कृष्णसाई वंदनाप्पु प्रथम, आयन सोमानी द्वितीय तर संभव भटेवरा याने तृतीय क्रमांक पटकावला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील शालेय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन दि.१९ ते २० ऑगस्ट २०२४ दरम्यान महापालिकेच्या डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल स्केटिंग मैदान मासुळकर कॉलनी पिंपरी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या स्पर्धेत नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचा कृष्णसाई वंदनाप्पु प्रथम, प्रतिभा इंटरनेशनल स्कुलचा आयन सोमानी द्वितीय, पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवडचा संभव भटेवरा तृतीय, जी के गुरुकुल पुणेचा युवराज पाटील चतुर्थ तर रसिकलाल धारीवाल स्कूलचा अर्णव चावदीमणी पाचवा ठरला आहे. या स्पर्धेस खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला होता, त्यामध्ये एकुण ६२७ मूली व १२२२ मुली असे कुण १८४९ स्पर्धक सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेसाठी श्रध्दा विचवेकर (चीफ ऑरबीटर), विवेक भागवत, सदाशिव गोडसे, विकास देशपांडे, शुभम चौधरी, अभिजित पाध्ये, रामभाऊ चौधरी, मधुकर पानदरे, अभय घनवट , मानसी भागवत यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी बाळू काळभोर, युवराज गवारी, नितिन चावरीया, गणेश लांडगे, विलास लांडे, भानुदास बलकवडे यांनी नियोजनासाठी सहकार्य केले.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या निर्देशानुसार तसेच सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अनिता केदारी , क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोणे, हरिभाऊ साबळे , दादाभाऊ होलगुडे , ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक शेखर कुलकर्णी, राजेंद्र महाजन, क्रीडा पर्यवेक्षक बाळाराम शिंदे उपस्थित होते.