Sunday, May 10, 2026
Homeक्रिडाविश्व12 वर्षाखालील मुलांच्या "व्हेरॉक कप" एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

12 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

सालाबादप्रमाणे पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने नव्या क्रिकेट मोसमाची सुरुवात करताना युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून नवंवर्षाच्या सुरुवातीला 12 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” ह्या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

04 जानेवारी 2023 ते 02 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणाऱ्या ह्या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या दोन संघासह

ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी
एच के बाऊन्स अकॅडमी
आर्यन्स क्रिकेट अकॅडमी,
ओमसाई क्रिकेट अकॅडमी
स्पार्क स्पोर्ट्स अकॅडमी
सहारा क्रिकेट अकॅडमी
परंडवाल क्रिकेट अकॅडमी
स्पोर्टिव्ह क्रिकेट अकॅडमी
कॅनॉन क्रिकेट अकॅडमी
कोकाटे क्रिकेट अकॅडमी
स्कोअर स्पोर्ट्स अकॅडमी
गॅरी कर्स्टन अकॅडमी
पेस अथलेटिक्स अकॅडमी
अचिव्हर्स क्रिकेट अकॅडमी

अशा नामांकित सोळा संघांना निमंत्रित करण्यात आले आहे, संपूर्ण स्पर्धा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नियमानुसार खेळवण्यात येईल, सुरुवातीला चार गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये उपांत्यफेरीचे सामने होतील. अंतिम सामना 02 फेब्रुवारी 2023 रोजी होईल, थेरगाव येथील मैदानावर 04 जानेवारी 2023 रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल , स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथे होतील,

प्रत्येक सामना 45 षटकांचा असेल, प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल पारितोषिक वितरण 02 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे शुभहस्ते होईल,

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments