Thursday, January 16, 2025
Homeमुख्यबातम्यामहापालिकेच्या वतीने ‘’जल्लोष शिक्षणाचा २०२४’’ कार्यक्रमाचे आयोजन

महापालिकेच्या वतीने ‘’जल्लोष शिक्षणाचा २०२४’’ कार्यक्रमाचे आयोजन

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ आणि २४ जानेवारी रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ या भव्य कार्यक्रमाचा शैक्षणिक सराव विविध उपक्रमांद्वारे महापालिकेच्या सर्व १२८ शाळांमध्ये मागील दोन महिन्यांपासून सूरू आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रतिभा, सर्जनशीलता तसेच शिक्षकांचे प्रयत्न आणि नवकल्पना प्रदर्शित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

याबाबत माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ हा कार्यक्रम महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक परिणाम घडवून आणेल अशी आशा आहे. जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमाद्वारे महापालिका शाळांमध्ये सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण तयार होण्यास मदत होत असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे.

अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले, ‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ हा उपक्रम महापालिका शाळांमधील महत्वाचा घटक आणि शिक्षणाचा उत्सव आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षकांना महापालिका शाळांच्या यशाचे आणि आकांक्षांचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप :-
‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय प्रदर्शन, विविध मुद्द्यांवर चर्चासत्र, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा सन्मान तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नृत्य, संगीत आणि लोककलांचा समावेश असणार आहे. तसेच शालेय प्रदर्शनांमध्ये शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प, आराखडे, चित्रकला, हस्तकलांचा समावेश असणार आहे. चर्चासत्रांमध्ये महापालिका शाळांमधील माजी विद्यार्थी त्यांचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहेत. यासोबतच शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments