Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीवाकडमध्ये "डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसी" कार्यक्रमाचे आयोजन

वाकडमध्ये “डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसी” कार्यक्रमाचे आयोजन

खासदार प्रियंका चतुर्वेदी व आप नेते अजित फाटके करणार मार्गदर्शन

इंडिया आघाडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसीचे आयोजन करण्यात आले आहे. वाकड काळेवाडी चौक येथील हॉटेल ॲम्बिअन्स येथे शनिवारी (दि.२७ एप्रिल) संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी व आम आदमी पार्टी, महाराष्ट्रचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, इंडिया आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील असणार आहेत. त्यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, मावळ लोकसभेचे प्रचारप्रमुख योगेश बाबर, महिला शहर संघटिका अनिता तुतारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, आम आदमी पार्टी महाराष्ट्र पदवीधर आघाडीचे अध्यक्ष चेतन बेंद्रे, शिवसेनेचे विभागप्रमुख मचिंद्र देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा महोत्सव 2024 लोकसभा निवडणुकीत होत आहे. भारतातील लोकशाही मूल्ये जपण्यासाठी नागरिकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. मतदारसंघातील मतदारांशी लोकशाही आणि विकास या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती आम आदमी पार्टी महाराष्ट्र पदवीधर आघाडीचे अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments