Sunday, June 15, 2025
Homeउद्योगजगतसामान्य लोकांचा ‘म्हाडा’वर विश्वास, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लॉटरीची सोडत

सामान्य लोकांचा ‘म्हाडा’वर विश्वास, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लॉटरीची सोडत

२ जुलै २०२१,
सध्या कोरोनाच्या संकटाचा काळ सुरु आहे. या संकटाच्या काळातसुद्धा म्हाडाच्या २ हजार ९०८ घरांसाठी ५७ हजार जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. घरांसाठी इतक्या मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याचाच अर्थ सामान्य लोकांचा ‘म्हाडा’वर विश्वास असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सामान्य जनतेचा हाच विश्वास ‘म्हाडा’ने जपण्याचे, वाढवण्याचे आवाहन आज केले .

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) २ हजार ९०८ सदनिकांसाठीची ऑनलाईन लॉटरीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने व नागरिक उपस्थित होते.

मुंबई, पुण्यासारख्या शहरात आपलंही एक घर असावं असे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हाडाच्या लॉटरीत घरांसाठी अर्ज करणे हा सुध्दा या प्रयत्नाचाच एक भाग आहे. या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सगळयांनाच घर मिळावं, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु आज फक्त २ हजार ९०८ घरं असल्याने तितक्याच जणांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्यांचा नंबर लागणार नाही त्यांनी निराश न होता प्रयत्न करत राहिलं पाहिजे. एक ना एक दिवस प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर हा आपला कार्यक्रम आहे. आज २ हजार ९०८ घरांच्या लॉटरीचा हा सुध्दा त्याच ध्येयाच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल आहे.

पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या नव्याने वाढणाऱ्या शहराचा विकास नियोजनबध्द करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. राहण्यासाठी राज्यातलं सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा क्रमांक लागतो. हे राज्यात सर्वोत्तम असणारं आपल पुणे शहर देशात सर्वोत्तम बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करु या, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

म्हाडाचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. पुणे शहराच्या विकासासाठी म्हाडाने आणखी चांगले योगदान देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. आज लॉटरीच्या निमित्त ज्यांना हक्काचे घरं मिळणार आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन. इतरांनी निराश न होता म्हाडाच्या पुढच्या सोडतीत भाग घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऑनलाईन लॉटरीतील विजेत्या सदनिका धारकांना प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments