Tuesday, April 22, 2025
Homeताजी बातमीनागराज मंजुळेंचा नवीन सिनेमा 'खाशाबा' त काम करण्याची संधी… वाचा नियम व...

नागराज मंजुळेंचा नवीन सिनेमा ‘खाशाबा’ त काम करण्याची संधी… वाचा नियम व अटी.. ऑडिशन कुठे आणि कसे..?

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक असणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अनेक मातीतल्या कलाकारांना मोठं केलं. त्यांनी कित्येक अशा मुलामुलींना अभिनय क्षेत्रात संधी दिली ज्यांनी पुढे मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही काम केलं. याच नागराज अण्णांमुळे प्रेक्षकांना आर्ची भेटली, परशा भेटला. जब्या अन् शालू भेटले. या सगळ्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अभिनय क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना त्यांनी या कलाकारांना यशाच्या शिखरावर नेऊन बसवलं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक नवखी मुलं नंतर अभिनय क्षेत्रात आली. आता पुन्हा एकदा अशा काही मुलांना अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी चालून आली आहे. नागराज अण्णा यांनी स्वतः ही संधी देऊ केली आहे.

नागराज सध्या त्यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात करत आहेत. ‘झुंड’ आणि ‘घर बंदूक बिरयाणी’ सिनेमानंतर नागराज यांच्या या आगामी मराठी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. त्यासाठी त्यांना काही मातीतल्या मुलांची गरज आहे. तुम्ही जर तुमचं नशीब आजमावू पाहत असाल तर पुढे दिलेल्या नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. ‘खाशाबा’ या चित्रपटात नवोदीत कलाकारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी स्वतः पोस्ट करत ऑडिशनची माहिती दिली आहे.

नागराज यांनी पोस्ट पोस्ट करत लिहिलं, ‘जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित खाशाबा. चित्रपट ऑडिशन. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे.. फक्त मुलांसाठी.. वयोगट – ७ ते २५ वर्षे.. मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक. पाच फोटो ( त्यातील 3 फोटो शरीरयष्टी दाखवणारे) ३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ..३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै.. अशी पोस्ट नागराज मंजुळेंनी केलीय. तुम्ही या अटी पूर्ण करू शकत असाल तर एकदा ऑडिशनसाठी जाऊन आपलं नशीब आजमावू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments