स्व.शंकर आण्णा गावडे कर्मचारी महासंघ पॅनेल (निवडणूक चिन्ह बॅट)
३जानेवारी २०२०,
पिंपरी चिंचवड महानगपालिका कर्मचारी महासंघाची दि. १८/०७/२०१९ च्या मा.औदयोगिक न्यायालयाच्या निर्णयानुसार १९ वर्षामध्ये पहिल्यांदा गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक जाहिर करण्यात आली आहे. सदर निवडणूक केवळ एका पदाधिका-यास सन २०१८ साली खजिनदार पद न मिळाल्याने मा.कामगार आयुक्त पुणे यांचे परवानगीने पदाबाबतचा वाद मा.औदयोगिक न्यायालयात उपस्थित करणेत आला होता.
जे कर्मचारी महासंघाच्या कार्यपध्दतीवर आरोप करतात तेच महाशय मागील ११ वर्ष “खजिनदार” पदावर काम करित होते. पुन्हा त्यांना खजिनदार पद पाहिजे होते. ते न मिळाल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांच्या हेकेखोरपणामुळे महासंघाची निवडणूक लागली. या निवडणूकीसाठी होणारा सर्व खर्च कर्मचारी महासंघाच्या खात्यातुन म्हणजेच कर्मचा-यांच्या वर्गणीतून होणार आहे. हे एक प्रकारे कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान आहे.
मा.औदयोगिक न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया राबविणेसाठी मा.उपनिबंधक कामगार आयुक्त कार्यालय पुणे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. व त्यांनी ३ महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पुर्ण करावी असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार निवडणूक आधिका-यांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करित कर्मचारी महासंघाचे बुक्स ऑफ अकांऊंट, सभासद नोंद यादी ताब्यात घेऊन प्रक्रिया सुरु केली.
कोणत्याही संस्थेच्या निवडणूका होतात त्याचा खर्च त्या संस्थेच्या खात्यातुन केला जातो. निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत ते पदाधिकारी काळजीवाहू म्हणून काम पाहतात. सर्व निवडणूकांमध्ये मतदार/सभासद नोंद यादी असते तीच ग्राहय धरली जाते. संस्थेचे आर्थिक व्यवहार प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत स्थगित केले जातात. या कायदेशीर बाबींना विरोधक प्रशासक नेमला, भ्रष्टाचार झाला असा चुकीचा आरोप करित आहेत. सन २०१८-१९ पर्यंतचे कर्मचारी महासंघाचे लेखा परिक्षण झाले असून टिका करणा-यांच्या कार्यकालापर्यंतचे लेखापरिक्षण पुर्ण झालेले आहेत. त्यात कोणतेही आक्षेप नाहीत. विरोधकांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत ते आम्ही फेटाळत आहोत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ निवडणुक प्रचारार्थ स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलच्या वतीने शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पॅनल प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंजूर्डे यांनी केले.
महासंघाचे कामकाज :
सदर निवडणूकीमध्ये गेल्या १९ वर्षापासुन अध्यक्ष श्री.शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे अनेक प्रश्न कामगारांच्या एकजुटीने सोडविण्यात यश मिळालेले आहे. सन १९९९ साली स्व.शंकर आण्णा गावडे, बाबा बागल, शशिकांत झिंजुर्डे व इतर बरेच कार्यकर्ते यांचे एका विचारांमुळे व १४ संघटनांचे एकत्रिकरण करुन मान्यता प्राप्त कर्मचारी महासंघाची स्थापना सन २००० साली करण्यात आली आहे. ५ वा वेतन आयोग १०% वेतनश्रेणी, ६ वा वेतन आयोग, ७ वा वेतन आयोग या आर्थिक फायदयांच्या मुद्यांसह आरोग्य कर्मचा-यांचे प्रश्न, पदोन्नतीबाबत सततचा पाठपुरावा कामगारांसाठी आरोग्यदायी वैद्यकीय योजना, कर्मचा-यांच्या सेवा प्रवेश व शर्ती तयार करुन घेण्यास प्रशासन व पदाधिका-यांबरोबर समन्वय साधणे व सदर अहवाल शासनाकडे पाठविणे व मंजुरीबाबत पाठपुरावा करणे, राज्यातील महानगरपालिकेंच्या जकातीचा प्रश्न सोडविणे, लाड/अनुकंपा समितीच्या शिफारशींच्या बाबत पाठपुरावा करणे इ. व इतरही अनेक प्रश्न सोडविण्यात यश प्राप्त झाले आहे.
धन्वंतरी स्वास्थ्य योजना
कामगारांच्या जिव्हाळयाची असणारी धन्वंतरी स्वास्थ्य योजना ही सुरु करणेमध्ये कर्मचारी महासंघाने २००७ पासुन सातत्याने प्रयत्न केले होते. त्यास सप्टेंबर २०१५ ला ही योजना सुरु करणेस यश प्राप्त झाले आहे. धन्वंतरी स्वास्थ्य योजना अत्यंत प्रभावीपणे व चांगल्या पध्दतीने तयार केली गेली होती. तथापि सन २०१५ ते नोव्हेंबर २०१९ अखेर जवळपास १८,४५६ लाभार्थींवर रक्कम रु.७९,८३,३०,३५२/- इतका खर्च झालेला आहे. यापैकी अदयापही ११ कोटींची बिले अदा करणे बाकी आहे. सदर खर्चाचा विचार करता तात्कालीन मुख्य लेखापरिक्षक व मुख्य लेखा अधिकारी यांनी समिती योजनेतील सभेमध्ये सुचविलेप्रमाणे सदरची योजना विमा कंपनीमार्फत राबविणेबाबतचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार श्री.शशिकांत झिंजुर्डे यांनी “विमा कंपनीने धन्वंतरी योजनेच्या अटी शर्तींवरच ही योजना विमा कंपन्यांनी राबविणेत यावी यासाठी विनंती केली”. धन्वंतरीमध्ये दरवर्षी अंदाजे २० कोटीपर्यंतचा खर्च होत असल्याने निविदा पध्दतीने मध्यस्थाची नेमणूक करुन त्यांचेमार्फत विमा कंपन्यांना धन्वंतरी योजनेच्या धर्तीवर विमा सुविधा पुरविणेकामी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल प्रसिध्द करणेत आलेले होते. त्यामध्ये खालीलप्रमाणे जास्तीच्या वैद्यकीय सुविधा अंर्तभुत करणेत आलेल्या आहेत.
कर्मचारी व कुटूंबियांसाठी ओपीडी सुविधा.
1) प्रति कुटूंब र.रु.५०००/- दुर्धर आजारांसाठी औषधे मिळतील. तसेच याव्यतिरिक्त मोठया आजारांसाठी अधिक आवश्यकता असल्यास मा.आयुक्त सो यांचे मान्यतेने र.रु.१ कोटी बफरमधून औषधे देण्यात येतील.
2) प्रति कुटूंब वार्षिक र.रु.३ लाखांचा विमा उतरविणेत आलेला आहे. तथापि र.रु.३ लाखावरील जीवघेण्या आजारासाठी र.रु.५ कोटी बफरमधून मा.आयुक्त सो यांचे मान्यतेने उपचार मिळणार.
3) सेवेतील अधिकारी व कर्मचा-यांसाठी र.रु.५ लाखाचा अपघाती विमा.
4) रुग्णालयातुन डिसचार्ज झालेनंतर आवश्यकता असलेस ३० ते ६० दिवसांची औषधे योजनेतून उपलब्ध होणार.
5) बोन मॅरो ट्रान्स्प्लांन्टच्या सुविधेसह इतरही दुर्धर आजारांचा यात समावेश आहे.
6) शिक्षण मंडळातील सेवेतील व सेवानिवृत्त अंदाजे १८०० ते १९०० शिक्षकांचा विमा योजनेमध्ये समावेश करणेत आलेला आहे.
7) सदर वैद्यकीय उपचार हयात असेपर्यंत असून त्यात सेवानिवृत्तांना वयाची अट नाही.
कामगार भवन :
कामगार भवनाच्या उभारणीसाठी मनपाकडून जागा प्राप्त झाली असून कामगारांच्या बोनसमधून सन २००४ – ०५ पासून कपात केलेली रक्कम बांधकामासाठी वापरणेत येणार आहेत. सदर भवनासाठी कै.शंकर आण्णा गावडे स्मृती भवन समिती स्थापन केलेली असून त्यामध्ये महापालिकेतील पदसिध्द अतिरीक्त आयुक्त, सहा. आयुक्त प्रशासन, सहा.आयुक्त भुमी जिंदगी, सहा.आयुक्त कामगार कल्याण विभाग, मुख्य लेखाधिकारी असे पाच व महासंघाचे अध्यक्ष, खजिनदार, महासचिव व एक कार्यकर्ता असे चार, मिळून एकूण नऊ लोकांची समिती रजिस्टर केलेली आहे. यामध्ये महापालिकेतील अभियंत्याच्या मदतीने सदर भवनाचे डीएसआर रेटप्रमाणे इस्टिमेट तयार करुन राज्यातील तीन प्रमुख वर्तमानपत्रामध्ये निविदा प्रसिध्द करुन, त्यानुसार एल १ निविदा धारकास १० टक्के कमी दराने काम देण्यात आलेले आहे.
सातवा वेतन आयोग :
सातवा वेतन आयोगामध्ये सहाव्या वेतन आयोगाशी समकक्ष वेतनश्रेण्या तयार करणेत आल्या असून कर्मचा-यांच्या विविध भत्यांमध्ये वाढ करुन सदरचा प्रस्ताव शासनाकडे जुन २०१९ ला मान्यतेकामी पाठविणेत आलेला होता. त्याबाबत श्री.शशिकांत झिंजुर्डे यांनी सतत पाठपुरावा करुन वेतन श्रेण्या मंजुर करुन घेऊन वेतन आयोग लागू करुन घेतला आहे. सदर वेतन आयोगातील फरक कर्मचा-यांना रोख स्वरुपात १ जानेवारी व १ जुलै याप्रमाणे ५ हप्त्यांमध्ये देणेबाबत मान्यता घेतली आहे. याकामी अर्थसंकल्पात फरकासाठी तरतुदही करणेत आलेली आहे. याचा लाभ सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी तसेच शिक्षण मंडळातील सेवेतील व सेवानिवृत्त शिक्षकांसह अंदाजे ९ हजारापेक्षा जास्त कर्मचा-यांना मिळणार आहे.
कर्मचा-यांवर ज्यांनी ही निवडणूक लादली आहे ते कर्मचारी महासंघाचे माजी खजिनदार महासंघाविरोधात सोशल मिडीया, प्रिंट किंवा इलेक्ट्रानिक मिडियाद्वारे कामगारांना चुकीची माहिती देऊन दिशाभुल करत आहे. हिच बाब चुकीची व कर्मचारी महासंघाच्या प्रतिमेस काळीमा फासणारी आहे. त्यांच्या विरोधात आम्ही सर्वजण स्व.शंकर आण्णा गावडे कर्मचारी महासंघ पॅनेलच्या माध्यमातुन ही निवडणूक लढवत आहोत. आमचे पुर्ण पॅनेल बहुमताने
निवडून येईल याचा आम्हाला विश्वास आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ निवडणूक स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनल अधिकृत उमेदवार निवडणूक चिन्ह बॅट अध्यक्ष श्री. झिंजूर्डे शशिकांत उर्फ बबनराव खंडू, उपाध्यक्ष श्री. वाघेरे महाद्रंग नामदेव, सरचिटणीस श्रीमती जोशी चारूशिला किशोर, चिटणीस श्री. येळवंडे शिवाजी बाबूराव, सहसचिव श्री. लांडगे संजय ज्ञानोबा, खजिनदार श्री. संमगिर नितीन संपत, प्रमुख संघटक श्री. माछरे मनोज प्रितमसिंग, संघटक श्रीमती सुकाळे सीमा अनिल, कार्यकारिणी सभासद – श्री. भूजबळ विशाल बाळासाहेब, श्री. चिंचवडे दिगंबर हरीभाऊ, श्री. गावडे चंद्रशेखर शंकर (आण्णा), श्री. राक्षे संजीव प्रल्हाद, श्री. कापसे संजय किसन, श्री. वाखारे मुकुंद विश्वनाथ, श्री. गुंजाळ दिलीप शिवराम, श्री. गंगावणे उत्तम सहादू, श्री. बेळगावकर सुनील सिद्धाप्पा, श्री. बांदल उमेश बाळासाहेब, श्री. मातेरे नथा नारायण, श्री. बोत्रे महादेव तुकाराम, श्री. कलापुरे मंगेश पोपट.
कर्मचारी हिताकरीता महासंघाच्या एकविचाराच्या संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन पॅनल प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंजूर्डे यांनी केले.
मतदान शनिवार, दि, 11 जानेवारी 2020 सकाळी 7 ते दुपारी 4 वा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत पिंपरी येथे होणार आहे.