Thursday, December 12, 2024
Homeआंतरराष्ट्रीयऑपरेशन अजय : इस्रायलहून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीला पोहचलं…

ऑपरेशन अजय : इस्रायलहून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीला पोहचलं…

इस्रायल, पॅलेस्टाईन हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. इस्रायलमधल्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्याची मोहीम सुरु झाली आहे. ऑपरेशन अजय असं नाव या मोहिमेला देण्यात आलं आहे. याच अंतर्गत २१२ भारतीयांना घेऊन पहिलं विमान बेन गुरियन विमानतळावरुन दिल्ली विमानतळावर पोहचलं आहे. एअर इंडियाचं हे विमान आज सकाळी ६ वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झालं. त्यावेळी दिल्ली विमातळावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी इस्रायलहून आलेल्या भारतीयांचं स्वागत केलं.

ऑपरेशन अजय ही इस्रायलमधल्या युद्धाच्या प्रसंगात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठीची भारताची मोहीम आहे. ७ ऑक्टोबरला तिथे युद्ध सुरु झालं. त्यानंतर एअर इंडियाने तातडीचा निर्णय घेत इस्रायलहून भारतात येणाऱ्या सगळ्या विमानांची उड्डाणं रद्द केली होती. त्यामुळे असे अनेक भारतीय इस्रायलमध्ये अडकून पडले होते ज्यांना मायदेशी परतायचं होतं. आता ऑपरेशन अजयच्या अंतर्गत तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणलं जातं आहे. तसंच भारत सरकारने हा सगळा खर्च केला आहे. या विमानांतून आलेल्या भारतीयांना तिकिटाच पैसे आकारण्यात आलेले नाही.

ऑपरेशन अजयच्या अंतर्गत भारतात येण्यासाठी तेल अवीव या विमानतळावरही गर्दी झाली आहे. जे भारतीय इस्रायलहून भारतात परतत आहेत त्यांच्यात बहुसंख्य विद्यार्थी आहेत. इस्रायलमध्ये शिक्षण घेणाऱ्या शुभम कुमार या विद्यार्थ्याने सांगितलं की जेव्हा इस्रायलमध्ये युद्ध सुरु झालं तेव्हा आम्ही सगळेच घाबरलो होतो. मात्र भारतीय दुतावासाने आम्हाला मदत केली. त्यामुळे आमचं मनोधैर्य वाढलं आणि आम्हाला भारतात आज परत येता आलं त्याचं आम्हाला समाधान आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments