Tuesday, November 12, 2024
Homeगुन्हेगारी“देशात जे सुरू त्याला केवळ ही महिला जबाबदार”, सर्वोच्च न्यायालयाचे नुपुर शर्मावर...

“देशात जे सुरू त्याला केवळ ही महिला जबाबदार”, सर्वोच्च न्यायालयाचे नुपुर शर्मावर ताशेरे

प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्यावर कठोर ताशेरे ओढले. देशात सध्या जे काही होतंय त्या केवळ ही महिला जबाबदार आहे. त्यामुळे नुपुर शर्मा यांनी देशाची माफी मागावी, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. विशेष म्हणजे यावेळी शर्मा यांच्या वकिलांनी त्यांनी माफी मागितल्याचं सांगितलं. त्यावर न्यायालयाने शर्मांनी भावना दुखावल्या असतील तर असं म्हणत सशर्त माफी मागितल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच त्यावर नाराजी व्यक्त केली.

न्यायमूर्ती सुर्यकांत म्हणाले, “आरोपी महिलेने कशापद्धतीने भावन भडकावल्या हे आम्ही टीव्हीवरील चर्चेत पाहिलं. ज्या पद्धतीने या महिलेने वक्तव्य केलं आणि नंतर मी एक वकिल असल्याचं सांगितलं ते लज्जास्पद आहे. तिने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.”

“देशात जे सुरू त्याला केवळ ही महिला जबाबदार”
“आरोपीला धमक्या येत आहेत की आरोपीच सुरक्षेला धोका आहे? या महिलेने देशभरातील भावनांना चिथावणी दिली आहे. देशात जे काही सुरू आहे त्याला केवळ ही महिला जबाबदार आहे,” असं संतप्त निरिक्षण न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी नोंदवलं.

आरोपी नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात दाखल झालेले गुन्हे एकाच ठिकाणी दिल्लीत हस्तांतरीत करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत नुपुर शर्मा यांना धमक्या मिळत असल्याचाही दावा शर्मा यांच्या वकिलांनी केला. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढत नुपुर शर्मा यांना सुनावले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments