१२ जुलै २०२१,
उद्या दि.१३/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
अ.क्र. | लसीकरण केंद्राचे नाव | वयोगट | फक्त दुसरा डोस लाभार्थी क्षमता |
१ | स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगर | वय वर्षे १८ ते ४४ | १०० |
२ | नवीन भोसरी रुग्णालय | वय वर्षे १८ ते ४४ | १०० |
तसेच उद्या दि.१३/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा वरील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
अ.क्र. | लसीकरण केंद्राचे नाव | वयोगट | फक्त दुसरा डोस लाभार्थी क्षमता |
१ | निळु फुले नाटयगृह, सांगवी | वय वर्षे ४५ वरील | १०० |
२ | इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड | वय वर्षे ४५ वरील | १०० |
वय वर्षे १८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल. तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.१३-०७-२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
वय ४५ वर्षा वरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि.१३/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण उद्या दि.१३/०७/२०२१ रोजी बंद राहील.
दि. १३/०७/२०२१ रोजी “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.