Wednesday, February 11, 2026
Homeअर्थविश्वमहापालिका निवडणुकीत केवळ ५७.७१ टक्के मतदान; नागरिकांमध्ये अपेक्षित उत्साह नाही

महापालिका निवडणुकीत केवळ ५७.७१ टक्के मतदान; नागरिकांमध्ये अपेक्षित उत्साह नाही

पिंपरी–चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज शहरात मतदान प्रक्रिया पार पडली. वयोवृद्ध, महिला, दिव्यांग तसेच नवोदित मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात सहभाग नोंदविला. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडली असून शहरात सरासरी ५७.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.

संपूर्ण शहरात आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांच्या अंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.५६ टक्के, तर ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढून १६.३० टक्के झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत २८.१५ टक्के, तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४०.५० टक्के मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५७.७१ टक्के मतदान पूर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात काही प्रमाणात मतदारांचा ओघ वाढलेला दिसून आला.

मात्र, तब्बल ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महापालिकेची निवडणूक होत असतानाही नागरिकांमध्ये अपेक्षित उत्साहाचा अभाव दिसून आला, अशी चर्चा शहरभर होत आहे. मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा राबवूनही मतदानाचा टक्का समाधानकारक वाढू न शकल्याने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.

प्रभागनिहाय मतदान टक्केवारी

प्रभाग क्र. १ – ६०.६१ टक्के

प्रभाग क्र. २ – ६४.९१ टक्के

प्रभाग क्र. ३ – ६०.९७ टक्के

प्रभाग क्र. ४ – ५७.०८ टक्के

प्रभाग क्र. ५ – ६१.५८ टक्के

प्रभाग क्र. ६ – ५५.७२ टक्के

प्रभाग क्र. ७ – ५८.३७ टक्के

प्रभाग क्र. ८ – ६०.१९ टक्के

प्रभाग क्र. ९ – ५६.९१ टक्के

प्रभाग क्र. १० – ४९.५४ टक्के

प्रभाग क्र. ११ – ५४.७१ टक्के

प्रभाग क्र. १२ – ६५.१४ टक्के

प्रभाग क्र. १३ – ५४.२७ टक्के

प्रभाग क्र. १४ – ५३.४४ टक्के

प्रभाग क्र. १५ – ५५.५६ टक्के

प्रभाग क्र. १६ – ६२.४५ टक्के

प्रभाग क्र. १७ – ६०.०४ टक्के

प्रभाग क्र. १८ – ५६.१८ टक्के

प्रभाग क्र. १९ – ४९.२२ टक्के

प्रभाग क्र. २० – ५५.४२ टक्के

प्रभाग क्र. २१ – ५६.७६ टक्के

प्रभाग क्र. २२ – ६०.२८ टक्के

प्रभाग क्र. २३ – ६३.३७ टक्के

प्रभाग क्र. २४ – ६१.७२ टक्के

प्रभाग क्र. २५ – ६०.४८ टक्के

प्रभाग क्र. २६ – ५५.३० टक्के

प्रभाग क्र. २७ – ६१.०१ टक्के

प्रभाग क्र. २८ – ५४.८८ टक्के

प्रभाग क्र. २९ – ५४.५९ टक्के

प्रभाग क्र. ३० – ५४.२२ टक्के

प्रभाग क्र. ३१ – ५२.०० टक्के

प्रभाग क्र. ३२ – ५७.५९ टक्के

कंट्रोल रूमद्वारे संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात मुख्य कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली होती. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी कंट्रोल रूममधून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.

यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक सुधांशू राय आणि निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनीही कंट्रोल रूमला भेट देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत आणि कोणत्याही अनुचित प्रकाराविना मतदान प्रक्रिया पार पडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments