Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीलहुमुद्रा सोशल फौंडेशनच्या वतीने एक हजार एकशे एक N-95 मास्क पोलीस आयुक्त...

लहुमुद्रा सोशल फौंडेशनच्या वतीने एक हजार एकशे एक N-95 मास्क पोलीस आयुक्त कार्यालयास सुपूर्त

५ ऑगस्ट २०२१,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी म्हणजेच १०१ व्या जयंती निम्मित लहुमुद्रा सोशल फौंडेशन च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्त कार्यलयास N -९५ मास्कचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रबोधन पर्व २०२१ समारोप प्रसंगी वाटप करण्यात आले.

करोना काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून शहरातील जनतेच्या सेवेत पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत ,व कर्तव्य बजावत असताना करोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून लहुमुद्रा सोशल फौंडेशन चे संस्थापक ,अध्यक्ष् अनिल रावसाहेब सौदडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निम्मित पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा श्री.कृष्णप्रकाश सर यांच्या कडे एक हजार एकशे एक ( ११०१) N -९५ मास्क सुपूर्त केले.

या वेळी लहुमुद्रा सोशल फौंडेशन चे पदाधिकारी सचिव , महेश खिलारे ,कार्याध्यक्ष योगेश लोंढे ,उपाध्यक्ष तानाजी साठे ,बालाजी मोरे तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष संजय ससाणे ,सचिव शिवाजी साळवे ,मनोज तोडरमल ,नितीन घोलप ,ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब अडागळे ,अरुण जोगदंड,गणेश साठे , डॉक्टर धनंजय भिसे प्रसिद्धी प्रमुख किशोरभाऊ हातागळे ,भगवान शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments