पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाला ड्रीम ११ च दीड कोटींचं बक्षीस लागलं आहे. सोमनाथ झेंडे असं हे बक्षीस जिंकणाऱ्या उपनिरीक्षकाचं नाव आहे. सोमनाथ झेंडे हे पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत असतात. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे आणि आपण तो रेग्युलरी पाहतो असंही त्यांनी सांगितलं. तसंच क्रिकेटची आवड असल्याचंही सांगितलं.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे कोट्यधीश झाले आहेत. झेंडे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मुख्यालयात कार्यरत असतात. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांनी ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरू केले होतं. त्यांनी कालच बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावरती ड्रीम इलेव्हन ची टीम तयार केली ती अव्वल आली असून त्यामुळे सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहेत. त्यांच्या खात्यावर दोन दोन लाख रुपये येण्यास सुरुवात झाले असल्याची माहिती त्यांनी लोकसत्ता ऑनलाईन ला दिली. यामुळे झेंडे यांच्या कुटुंबालाही आनंद झाला आहे. ड्रीम इलेव्हनवर बंदी आणण्याची मागणी केली जाते आहे. तरीही पोलीस उपनिरीक्षकाला लागलेली ही लॉटरी चर्चेचा विषय ठरली आहे.