Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीराजपथावर संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही.

राजपथावर संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही.

२ जानेवारी २०२०,
प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्राने यावेळी मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र प्रस्ताव नाकारण्यात आल्याने यावेळी राज्याचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात दिसणार नाही. दरवेळी रोटेशन पद्धतीने काही राज्यांना संधी मिळते. यंदा मात्र महाराष्ट्राचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. याआधी पश्चिम बंगालचा चित्ररथ प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. बंगालमधील कन्याश्री योजनेवर आधारित चित्ररथ करण्याचा प्रस्ताव होता. गेल्या पाच वर्षात दुसऱ्यांदा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे.

२६ जानेवारी रोजी दिल्लीमध्ये राजपथावर संचालनात सर्व राज्ये चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्राच्या चित्ररथाला आतापर्यंत सहा वेळा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. १९९३, १९९५ आणि १९९५ अशी तीन सलग वर्ष महाराष्ट्राने हा पुरस्कार पटकावला होता. तसंच २०१८ मध्येही चित्ररथासाठी पहिला क्रमांक मिळाला होता.महाराष्ट्राने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथ साकारला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments