क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष अक्षय शहरकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.11 एप्रिल) देहूरोड रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहराच्या कार्यक्षेत्रा लगतच्या परिसरातील पर्यावरणाचे संतुलन राहावे आणि त्यांचे संर्वधन केले तर त्याचा शहरातील सर्वच नागरिकांना उपयोग होईल यासाठी प्रशासनाच्या बरोबरच आता काँग्रेस पर्यावरण विभाग देखील पुढाकार घेत आहे. त्यामुळे आगामी काळात पर्यावरणाचा स्तर नक्कीच उंचावेल अशी अपेक्षा शहर काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष अक्षय शहरकर यांनी व्यक्त केली. देहूरोड रेल्वे स्टेशन येथे झालेल्या कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमास देहूरोड रेल्वे व्यवस्थापक राम रतन रजक तसेच काँग्रेस पर्यावरण विभाग शहर कार्याध्यक्ष इंद्रजीत गोरे, सिद्धांत रिकिबे, मीना गायकवाड, हुरबानो शेख, मनोज ढोकलिया, देवानंद ढगे, दिपा गायकवाड, प्रकाश पवार, धर्मचंद्र प्रजापति, ददन सिंह, संतोष इंगळे, ज्ञानेश्वर शिंदे तसेच आर. पी. एफ.निरीक्षक डी. एन. लाड, वी. पी. पवार, बसप्पा, स्वामी, अंजली कसबे, वंदना आरडे, यशोदा आदी उपस्थित होते.यावेळी कडुलिंब, अर्जुन, ताम्हण, वड, पिंपळ,मोगरा अशा देशी झाडांची लागवड करण्यात आले त्याची देखभाल देहूरोड रेल्वे स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करणार आहेत अशीही माहिती अक्षय शहरकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.