Saturday, December 7, 2024
Homeताजी बातमीलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने स्वारगेट भागात झाला वाहतूक बदल

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने स्वारगेट भागात झाला वाहतूक बदल

स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग दरम्यान वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने स्वारगेट भागात मंगळवारी (१ ऑगस्ट) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने १ ऑगस्ट रोजी सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी गर्दी होते. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग दरम्यान वाहतूक बदल करण्यात आले आहेत. जेधे चौकातून सारसबागेकडे वाहनचालकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहनचालकांनी सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी जेधे चौकाकडून सातारा रस्त्याने सरळ लक्ष्मीनारायण चौक – मित्रमंडळ चौकातून सावरकर चौकमार्गे सिंहगड रस्त्याकडे जावे लागेल. जेधे चौकातील उड्डाणपुलावरुन सारसबागेकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांना लक्ष्मीनारायण चौकातून डावीकडे वळून जावे लागेल. स्वारगेट येथील वेगासेंटर ते सारसबागपर्यंत भुयारी मार्गातून वाहनांना जाण्यास बंदी घालण्यात आली असून वाहनचालकांनी घोरपडे पेठ उद्यान, राष्ट्रभूषण चौकातून हिराबाग चौकातून इच्छितस्थळी जावे. टिळक रस्त्यावरील पूरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्गात वाहनांना आवश्यकेनुसार दुहेरी प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments