Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीनाट्य परिषदेतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते प्रशांत दामले यांना मानपत्र

नाट्य परिषदेतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते प्रशांत दामले यांना मानपत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि अखील भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियोजन समितीचे अध्यक्ष लोकनेते, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजनकरण्यातयेते. या वर्षी देखील नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे

अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोमवारी ( दि. १२ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

चिंचवडमधील प्रसिद्ध रंगकर्मी प्रशांत दामले यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीतील नुकतेच १२ हजार ५०० प्रयोगांचे जागतिक रेकॉर्ड झाले आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने दामले यांना शहराच्या वतीने मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. ‘‘मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीत अभिनेते प्रशांत दामले यांनी बहुमोल योगदान दिले आहे. दामले पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत. त्यांचे बालपण चिंचवडला गेले. त्यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने प्रयोगांचे विश्वविक्रम केला आहे. मुलाखतीनंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा नाट्यप्रयोगही सादर केला जाणार आहे. सदर कार्यक्रम सर्वासाठी विनामुल्य असून प्रवेशिका प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे उपलब्ध आहेत.

तसेच नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या सुरुवातीपासून सभासद असलेल्या चिंचवडमधील रहिवाशी आमदार उमाताई खापरे यांची विधानपरिषद सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे याप्रसंगी कुटुंबीय म्हणून उमाताई खापरे यांचा गौरवही करण्यात येणार आहे.’’ यावेळी राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments