Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीस्वातंत्र्यदिनानिमित्त अधिकारी कर्मचा-यांनी घेतली तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ मुक्ततेची शपथ..

स्वातंत्र्यदिनानिमित्त अधिकारी कर्मचा-यांनी घेतली तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ मुक्ततेची शपथ..

स्वातंत्र्यदिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रांगणात पार पडलेल्या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचा-यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत “आम्ही शपथ घेतो की, आम्हाला तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परीणामांची जाणीव आहे. म्हणून आम्ही जन्मभर, या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहोत. आमचे कार्यालय, आमचे घर, आणि आमचे परिसर तंबाखूमुक्त रहावेत, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी आम्ही प्रयत्न करू. भारत सरकारच्या, २००३ च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. आमच्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त तसेच ई सिगारेटमुक्त करू. आम्ही,आमचे कार्यालय, आमचे घर, आमचे गाव, आमची शाळा, आमची संस्था आणि, आमचा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करू ” अशी शपथ घेतली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,विजयकुमार खोराटे,चंद्रकांत इंदलकर,शहर अभियंता मकरंद निकम,मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रवीण जैन,मुख्य अभियंता श्रीकांत सवणे,सह शहर अभियंता संजय कुलकर्णी,संजय खाबडे,प्रमोद ओंभासे, उपआयुक्त विठ्ठल जोशी, संदीप खोत, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, राष्ट्रीय कार्यक्रमाच्या डॉ.अंजली ढोणे,डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ.तृप्ती सागळे, डॉ.ऋतुजा लोखंडे,तसेच पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे आणि विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments