Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीस्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण मोहीम तसेच दिव्यांग रॅलीचे स्वागत

स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण मोहीम तसेच दिव्यांग रॅलीचे स्वागत

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने एक पेड माँ के नाम अर्थात एक वृक्ष आईच्या नावे या उपक्रमाची सुरुवात महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. तसेच दिव्यांग भवन व शहरातील दिव्यांग सामाजिक संघटना यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांनी निगडी येथील भक्ती शक्ती चौक ते पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत तिरंगा सन्मान रॅली काढण्यात आली.

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिका, फिलिप्स ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस एलएलपी कंपनी आणि डीवायपी इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहर व रांजणगाव एमआयडीसी परिसरामध्ये १६ हजार झाडे लावण्यात येणार असून या झाडांची देखभाल देखील करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुरुवार १५ ऑगस्ट २०२४ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बिग्रेडियर एस तनुजा, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उद्यान आणि वृक्षसंवर्धन विभागाचे उपआयुक्त रविकिरण घोडके, उद्यान अधिकारी राजेश वसावे, मिलिटरी ऑफिसर शेंडे, डीवायपी कंपनीचे संचालक दत्तात्रय यादव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त दिव्यांग बांधवांनी रॅलीद्वारे सर्वाना दिला देशभक्तीचा संदेश

स्वातंत्र्यदिनानिमित्त निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून निघालेल्या दिव्यांग बांधवांच्या तिरंगा सन्मान रॅलीने महापालिकेच्या प्रशासकीय भवनातील प्रांगणात तिरंगा ध्वजास मानवंदना दिली. महापालिकेच्या प्रांगणात तिरंगा सन्मान रॅलीचे स्वागत विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भोसले, रामचंद्र तांबे, राजाराम पाटील, नवनाथ शिंदे, रमेश पिसे, ज्ञानेश्वर गायकवाड, संगीता जोशी काळभोर, लता दुराफे, प्राध्यापक रेवणनाथ करडीले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments