बालदिनाच्या औचीत्यावर पुणे मेट्रो, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आयोजित माझी स्मार्ट मेट्रो – बालदिन विषेश उपक्रमात ८०० पेक्षा अधिक शाळेतील मुलांनी वल्लभनगर येथील संत तुकाराम मेट्रो स्टेशनवर मेट्रोचा अनुभव घेतला.
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मुलांना मेट्रो विषयी माहिती दिली आणि त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मेट्रो विषयी मुलांमध्ये प्रचंड आकर्षण, कुतूहल दिसून आले. स्मार्ट सिटी टीम तर्फे मुलांना तसेच त्यांच्या पालकांना पीसीएमसी स्मार्ट सारथी या वन सिटी वन ॲप विषयी माहिती देण्यात आली. अनेकांनी ॲप तात्काळ त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले तसेच मुलांनी आम्ही आमच्या आई वडिलांना ॲप इंस्टॉल करण्यास सांगू असे आश्वासन दिले
मेट्रो सोबतच स्टेशनवर मनोरंजनात्मक, वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन मांडले होते, ज्यामध्ये भारतीय संस्कृती इतिहास यांना चालना देणारे खेळ मुलांना प्रत्यक्ष अनुभवता आले, मुलांना चॉकलेट्स खाऊचे वाटप करण्यात आले, मेट्रोबद्दल विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे दिल्याबद्दल मुलांना बक्षीसे देण्यात आली. त्यामूळे एकंदरच बच्चेकंपनी खूपच खुश होती.