Wednesday, December 6, 2023
Homeताजी बातमीउद्या अंगारकी चतुर्थीनिमित्त शिवाजी रस्त्यावर वाहतूक बंद 'या' पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे...

उद्या अंगारकी चतुर्थीनिमित्त शिवाजी रस्त्यावर वाहतूक बंद ‘या’ पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अंगारकी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी नागरिक मोठी गर्दी करण्याची शक्यता असल्याने येत्या मंगळवारी (१० जानेवारी) सकाळपासूनच शिवाजी रस्त्यावर लाल महालाच्या पुढे वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,
असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

  • पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज येथून इच्छितस्थळी जावे.
  • शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौक- जंगली महाराज रस्त्यामार्गे झाशीची राणी चौक, खंडूजीबाबा चौक, टिळक चौकामार्गे इच्छितस्थळी जावे.
  • स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातूनच जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी चौकात वळून इच्छितस्थळी जावे.
  • अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्यांनी बाजीराव रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जावे.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments