Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीदि. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंती विचार प्रबोधन...

दि. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंती विचार प्रबोधन पर्वाचे महापालिकेकडून आयोजन…!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन दि. १७ फेब्रुवारी ते दि. १९ फेब्रुवारी या दरम्यान पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आलेले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

गुरुवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, संग्राम थोपटे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे यांच्यासह पदाधिकारी, नगरसदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभानंतर सायंकाळी ६ वाजता ख्यातनाम मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचे “छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण” या विषयावर व्याख्यान होईल. यानंतर शाहिर संतोष साळुंके हे पोवाड्यांचा कार्यक्रम सादर करतील.

शुक्रवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता “छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील बहुजनांची भूमिका आणि सद्यस्थिती” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये माजी खासदार हरीभाऊ राठोड, सामाजिक नेते राजेंद्र कोंढरे, प्रसिध्द विचारवंत प्रा. डॉ. सुरेश शेळके आणि भारतीय संविधान अभ्यासक शशिकांत औरंगाबादकर सहभागी होणार आहेत. यानंतर सायंकाळी ७ वाजता ख्यातनाम शाहिर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलश्याचा कार्यक्रम होईल.

शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सुप्रसिध्द शाहिर राजेंद्र कडूसकर यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता शिवव्याखाते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे “लोककल्याणकारी राजा शिवछ्त्रपती” या विषयावर व्याख्यान होईल. यानंतर अरुणोदय प्रॉडक्शन लोणावळा प्रस्तुत शिवराज्याभिषेक हे महानाट्य सादर होणार आहे.

हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण www.facebook.com/pcmcindia.gov.in या फेसबुक पेजवरून आणि pcmcindia या यू ट्यूब चॅनेलवरुन होणार आहे. या लिंकद्वारे नागरिकांनी सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments