लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये फक्त आप्पच …
महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस मताने महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठवाड्यामधील लातूर शहरात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख साहेब यांचा राजकीय वारसा जपणारे आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धीरज देशमुख यांचा 2024 या विधानसभेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश आप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातून आपला विजय मिळवला. गेली अनेक वर्ष लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीण मध्ये रमेश आप्पा कराड आणि सुरांग लावला. यानिमित्ताने लातूर ग्रामीण मतदारसंघातील सलगरा बु. येथील ग्रामस्थांनी विद्यमान आमदार रमेश आप्पा कराड यांचे लातूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी सलगरा बु. येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ,या विधानसभेच्या वेळी सलगरा( बु ) येथील ग्रामस्थांनी रमेश आप्पा कराड यांच्या पाठीशी मोठ्या मताधिक्याने व भरभरून मते देऊन एक भक्कम अशी साथ रमेश आप्पा कराड यांच्या पाठीशी दिली आहे. यावेळी रमेश आप्पा कराड यांनी सलगरा बु. येथील संपूर्ण पदाधिकारी व ग्रामस्थांचे आभार मानून त्यांना गावाच्या सर्व विकासासाठी प्रयत्नशील राहील अशे आव्हान केले आहे.