Friday, September 13, 2024
Homeताजी बातमीमहापालिकेच्या वतीने विविध व्यापारी संकुलातील गाळे व भाजी मंडई ओटे यांची आरक्षण...

महापालिकेच्या वतीने विविध व्यापारी संकुलातील गाळे व भाजी मंडई ओटे यांची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीतील व्यापारी संकुल गाळे किंवा भाजी मंडईतील ओटे आरक्षित आणि निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील आकुर्डी, रेल्वे स्टेशन, चिखली, रावेत, दापोडी या विविध ठिकाणी दिव्यांग व्यक्ती, महिला आणि अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती खुल्या गटातील व्यक्तींना आरक्षण देण्यात येणार असून उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. हे गाळे आरक्षित करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असून याबाबत लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

२९ जुलै २०२४ ते २३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या गाळे वाटप सोडतीत व्यापारी संकुलातील गाळे आणि भाजी मंडई ओटे हे आरक्षित ठेवण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींना ५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांना ५ टक्के आरक्षण तर महिलांसाठी ३० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तसेच खुल्या गटातील व्यक्तींना उर्वरित गाळेवाटप करण्यात येणार आहे. या गाळेवाटप सोडतीच्या वेळी भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, मुख्यलेखापरीक्षण विभागाचे लेखाधिकारी राजन वडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच भूमी आणि जिंदगी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

मौजे आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील जागेत खाद्य पदार्थ केंद्र उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी एकूण ४९ गाळे उपलब्ध असून दिव्यांग व्यक्तींना २ गाळे अनुसूचित जाती,जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांना २ गाळे, महिलांसाठी १५ गाळे याठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून खुल्या गटासाठी ३० गाळे उपलब्ध आहे.

मौजे चिखली सेक्टर नंबर १७ आणि १९ घरकुल या ठिकाणी नवीन विकसित झालेल्या भाजी मंडई ओटे येथे एकूण ४२ गाळे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना २, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांना २ , महिलांसाठी १३ गाळे तर खुल्या गटासाठी २५ गाळे उपलब्ध आहेत.

मौजे चिखली सेक्टर नंबर १७ आणि १९ घरकुल या ठिकाणी नव्याने विकसित करण्यात आलेल्या इमारतीतील व्यापारी गाळे याठिकाणी ११ गाळे उपलब्ध असून दिव्यांग व्यक्तीसाठी १, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांना १, महिलांसाठी ३ आणि खुल्या गटासाठी ६ गाळे उपलब्ध आहेत.

मौजे रावेत स.नं. ९५ पै. येथील पार्किंग, शॉपिंग सेंटर मार्केट मध्ये बांधलेल्या इमारतीमधील व्यापारी संकुल इमारतीतील दुकान गाळे आणि ऑफिस गाळे याठिकाणी १२ गाळे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी १, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांना १, महिलांसाठी ४ आणि खुला गटासाठी ६ गाळे उपलब्ध आहेत.

मौजे दापोडी येथील स.नं. १२ पै. आणि १३ पै. येथील वाहनतळ , रिटेल मार्केट इमारतीमधील व्यापारी गाळे याठिकाणी १० गाळे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यापैकी दिव्यांग बांधवांना १, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांना १, महिलांना ३ तर खुल्या गटाला ५ गाळे उपलब्ध आहेत.

महापालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या समितीत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे हे अध्यक्ष असून भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे हे सचिव आहेत. तसेच समितीच्या इतर सदस्यांमध्ये मुख्यलेखापरीक्षक प्रमोद भोसले, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता राजेश मोराणकर यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments