Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीमहापालिकेच्या वतीने इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती...

महापालिकेच्या वतीने इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवस साजरा

भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उपपंतप्रधान केंद्रिय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येते तसेच त्यादिवशी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली जाते.त्यानुसार उपस्थितांनी “आम्ही राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करू तसेच आम्ही देशवासियांमध्ये हा संदेश पोहचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करू,आम्ही ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहोत जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता आम्ही स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहोत ” अशी सामुहिक शपथ राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने घेतली.

या कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन तसेच राष्ट्रीय एकता शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments