८ जानेवारी २०२०,
इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने मोठा हल्ला चढवला आहे. किमान १२ क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकेच्या लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली आहेत. पेंटागॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचे ढग आणखीच गडद झाले आहेत.
अमेरिकेने बगदाद येथील विमानतळाबाहेर शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इराण विरुद्ध अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणने इराकमधील अमेरिकी दूतावास तसेच हवाईतळाला लक्ष्य केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकेच्या मालकीच्या हवाईतळावर मोठा हल्ला इराणने चढवला आहे.
७ जानेवारी रोजी ५.३० मिनिटांनी (ईएसटी) इराणनं इराकमधील लष्कराच्या हवाई तळांवर १२ पेक्षा अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे साहाय्यक जोनाथन हॉफमॅन यांनी दिली. ही क्षेपणास्त्र इराणकडून डागण्यात आली. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी लष्कराचं तळ हे त्यांचं लक्ष्य होतं,असंही त्यांनी नमूद केलं.
#WATCH: Iran launched over a dozen ballistic missiles at 5:30 p.m. (EST) on January 7 and targeted at least two Iraqi military bases hosting US military and coalition personnel at Al-Assad and Irbil, in Iraq. pic.twitter.com/xQkf9lG6AP
— ANI (@ANI) January 8, 2020