शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात असलेले ‘नागरी सुविधा केंद्र’ साकळी वेळेत न उघडल्याने नागरिकांना ताटकळत बसावे लागले. दुपारी जेवणाची वेळ दोन ते आडीच असतांना देखील तीन वाजेपर्यंत अधिकारी जागेवर उपस्थित नसल्याचे दिसून आले. कित्येक अधिकाऱ्यांच्या खुर्चा रिकाम्या दिसून आल्या.
तळमजल्यावर कर संकलन विभागात, दर्शनी भागात सर्व्हर डाऊन असल्याचा सुचना फलक लावण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावरील हिरकणी कक्ष, महिला अंतर्गत तक्रार निवारण समिती कक्ष बंद असल्याचे दिसून आले.
वृक्ष काढण्यासाठी लागत असलेला विनंती अर्ज फॅार्म डी, वृक्ष विस्तार कमी करण्यासाठी लागणारा अर्ज जागेवर उपलब्ध नब्हता. अधिकारी जागेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्याची तक्रार नगरिक करत आहेत.
सर्व अधिकाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याच्या सुचना पुर्वीच केलेल्या आहेत. सध्या मी सुट्टीवर असल्यने अधिकारी जागेवर होते की नाही हे सांगता येणार नाही. हिरकणी कक्षात महिलांना स्तनपान करायचे असते तेव्हा आपण ते सुरू करून देतो. कर संकलनाचे काम मुख्य खात्याच्या माध्यमातून केले जाते.त्यामुळे सर्व्हर डाऊनचे काम मुख्य खाते पाहते.
- रवि खंदारे, सहायक अयुक्त, शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय
११ वाजले तरी कार्यालय सुरू नसते. अधिकारी जागेवर उपस्थित नसतात. पावसाळा सुरू झाला तरी झाडांच्या वाळलेल्या फांद्या काढल्या नाहीत. जागोजागी राडारोडा पडून आहे. ढिसाळ कारभार सुरू आहे. यामध्ये बदल झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- महेश हांडे रहिवासी, शिवाजीनगर गावठाण
अयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
नियमानुसार कार्यालय सुरू होणयाची वेळ सकाळी ९: ४५ प्रत्यक्ष मात्र दहा नंतरही अधिकारी हजर नसतात. कार्यालय सुटण्याची वेळ सायं ६:१५ वाजता असताना अधिकारी व कर्मचारी ५ वाजल्यापासून घरी जाण्यासाठी तयारी सुरू करतात. भोजनाची वेळ दूपारी २ ते २:३० असताना तीन वाजल्या तरी खुर्च्या रिकाम्याच दिसतात. नागरिकांनी अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ दर्शनी भागात दिसेल अशी लिहणे बंधनकारक आहे, अधिकारी कामानिमित्त बाहेर गेले असतील तर हलचाल नोंदवहीत लिहणे गरजेचे असताना या नियमांचे पालन होताना दिसत नाही.