Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवड पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल कारवाई

२५ डिसेंबर ,
पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी ‘सिंघम’ स्टाईल रस्त्यावरून काढली धिंड, यामुळे सर्वसामान्य व्यक्तींकडून समाधान व्यक्त केलं जातं आहे. तीन दिवसांपूर्वीच संबंधित आरोपींनी एका तरुणाला बेदम मारहाण करत धमकावले होते. वाकड पोलिसांनी विशाल कसबे, अरविंद साठे, बग्या उर्फ राहुल लष्करे, सूरज पवार यांची धिंड काढली. विशाल कसबे हा तडीपार गुंड आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी आरोपी बाळू भोसले, शाहरुख खान, अरविंद साठे, आकाश, राहुल पवार, सूरज पवार, बुग्या, सोमा लोखंडे आणि इतर ५ आरोपींनी काळखडक येथे मल्हारी मोतीराम लोंढे (२८) या तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण केली होती. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपींनी फिर्यादीला काळखडक येथील पाण्याच्या टाकीजवळ नेऊन ‘तू काय खूप मोठा झालास का? भेटायला बोलावलं तरी येत नाहीस. तुझ्यासाठी थांबायला आम्ही वेडे आहोत का ? तू आम्हाला जागा भाड्याने न देता दुसऱ्याला देतो. तुझी मस्तीच जिरवतो असे म्हणत लाकडी दांडके आणि लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments