आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरातील एकूण ९७ कोटी मतदारांना मतदान करण्याचा हक्क असेल. देशातील एकूण मतदारांची संख्या सुमारे ९७ कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे शुक्रवारी देण्यात आली. ताज्या मतदारयादीत २.६३ कोटी नव्या मतदारांची भर पडली असून हे नवमतदार वय १८ ते २९ या वयोगटातील आहेत.
- जगातील सर्वाधिक मतदारसंख्या
- आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मतदारसंख्या निवडणूक आयोगाकडून जाहीर.
- देशात एकूण ९६.८८ कोटी मतदार असल्याची नोंद.
- भारतीय मतदारसंख्या ही जगात सर्वाधिक असल्याची निवडणूक आयोगाची माहिती.
- २०१९ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत यावेळी वाढ.
- २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ८९.६ कोटी मतदार नोंदवले गेले होते.
- मतदारांमधील पुरुष-महिला गुणोत्तरातही बदल.
- २०१९मध्ये एक हजार पुरुष मतदारांमागे ९४० महिला मतदार होत्या. तर यंदा महिलांचे प्रमाण ९४८ नोंदवले गेले आहे.
- नवमतदारांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक म्हणजे, १.४१ कोटी. तर, पुरुष नवमतदारांची संख्या १.२२ कोटी.
- वय वर्षे १७ पूर्ण केलेल्या १०.६४ लाख तरुण-तरुणींनी मतदानाच्या अधिकारासाठी आगाऊ नोंदणी केली आहे.
- परंतु त्यांना या लोकसभा निवडणुकीत मतदानाची संधी नाही.
- या अर्जदारांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांची नावे सुधारित मतदारयादीत येणार.
प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक
सुधारित मतदारयादी तयार करताना नोंदी निर्दोष असाव्यात यावर भर तसेच, सुधारित मतदारयादीची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात आली, अशीही आयोगाची माहिती.
मतदारयादीत दुरुस्ती करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व राजकीय पक्षांचा तसेच, संबंधित घटकांचा सहभाग.