Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीआता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज काही मिनिटांत होणार अपलोड; नवीन वेबसाइट सुरू

आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज काही मिनिटांत होणार अपलोड; नवीन वेबसाइट सुरू

महायुती सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली होती. या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातील महिलांनी महिलांनी प्रतिसाद दिला आहे. पण या योजनेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कीही ठिकाणी सर्व्हर जाम, पोर्टल बंद अशा अनेक समस्यांना महिला तोंड देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी एक संकेतस्थळ सुरू केले आहे

सरकारने योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करता येत होता. मात्र योजना जाहीर केल्यानंतर अनेकदा सर्व्हर डाऊन, लोड आल्याने संकेतस्थळ बंद या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे सरकारने नवे संकेतस्थळ सुरू केले आहे. महिलांना आता हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही पटापट भरता येणार आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरता www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.

31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे, प्रशासनाचे आवाहन

या संकेतस्थळावर आपल्याला गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये. अद्यापही अर्ज सादर न केलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज भरताना कोणती कागदपत्रं लागणार?

आधारकार्ड
रेशनकार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचं प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज कुठे आणि कसा भरायचा?

योजनेसाठीचा अर्ज पोर्टल/मोबाईल अॅप/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments