Friday, June 13, 2025
Homeअर्थविश्वआता आयपीएलची ओळख ' टाटा आयपीएल' अशी होणार… आयपीएलमध्ये टाटा कंपनीची जोरादार...

आता आयपीएलची ओळख ‘ टाटा आयपीएल’ अशी होणार… आयपीएलमध्ये टाटा कंपनीची जोरादार एंट्री..!

विवो ही चीनी कंपनी काही दिवसांपासून आयपीएल टायटल स्पॉन्सर होती. पण आता बीसीसीआयने विवो कंपनीला डच्चू देत ही संधी आता टाटा या कंपनीला दिली आहे. आता पुढच्या वर्षापासून टाटा ही कंपनी आयपीएलची टायटल स्पॉर्न्सर असणार आहे. आता आता ‘ टाटा आयपीएल’ असं म्हणाताना भारतीयांचाही उर भरून येणार आहे.भारताच्या टाटा कंपनीने आता एक मोठं पाऊल उचललं आहे. आता आयपीएलबरोबर टाटा या कंपनीने आपलं नातं घट्ट केलं आहे.

आयपीएलमधील दोन नवीन संघांना ड्राफ्ट बनवण्यासाठी वेळ मिळायला हवा, असे आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिनला वाटले. त्यामुळे त्यांनी लिलावाची तारीखल दोन आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता आयपीएलचा मेगा लिलाव हा आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर हा लिलाव दोन दिवस चालेल, असेही सांगण्यात येत आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने याबाबतची सर्व माहिती आयपीएलमधील संघ मालकांना दिलेली आहे. त्यामुळे आता सर्वांनाच आयपीएलच्या या मेगा लिलावाची उत्सुकता लागलेली आहे. यावेळी आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद असे दोन नवीन संघ सर्वांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या सामन्यांमध्येही वाढ होणार आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार ७ आणि ८ फ्रेबुवारी रोजी बेंगळुरू येथे आयपीएल २०२२ साठीचा मेगा लिलाव होईल. कदाचीत आयपीएलमधील हा अखेरचा मेला लिलाव ठरू शकतो कारण स्पर्धेतील जवळ जवळ सर्व संघ लिलाव प्रक्रिया बंद करण्याची मागणी करत आहेत. बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनाची परिस्थिती खराब झाली नाही तर आयपीएलचा मेगा लिलाव भारतातच होईल. दोन दिवस चालणारी लिलाव प्रक्रिया बेंगळुरूमध्ये पार पडले आणि यासाठीची तयारी सुरू झाली आहे. पण आता आयपीएलबरोबर टाटा या कंपनीचे नाव जोडले गेले असल्यामुळे भारतीयांसाठी ही आनंदाची गोष्ट असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments