२२ जानेवारी २०२०,
अजय देवगणचा तान्हाजीः द अनसंग वॉरिअर सिनेमाला महाराष्ट्र सरकारने राज्यात करमुक्त म्हणून घोषीत केले आहे. याआधी तान्हाजी सिनेमा यूपी आणि हरियाणामध्ये करमुक्त करण्यात आला होता. वर्षाच्या सुरुवातीला १० जानेवारीला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित झाला होता.१३० कोटींच्या बजेटच्या या सिनेमाने आतापर्यंत १८० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अजय देवगणच्या करिअरमधील हा १०० वा सिनेमा आहे.नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे “तान्हाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.” अखेर जनतेच्या आग्रहाखातर सरकारने हा निर्णय घेतला आहे
Maharashtra Government makes film 'Tanhaji' tax-free in the state. pic.twitter.com/l3DttfvXJW
— ANI (@ANI) January 22, 2020
तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजीच्या माध्यमातून दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफ अली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत.