Tuesday, April 22, 2025
Homeअर्थविश्वकुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा अखेर लिलाव , सातपैकी सहा मालमत्तावर लागली...

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा अखेर लिलाव , सातपैकी सहा मालमत्तावर लागली बोली

१० नोव्हेंबर २०२०,
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा अखेर लिलाव झाला. दाऊदच्या सातपैकी सहा मालमत्ता विकल्या गेल्या आहेत. तर एक मालमत्ता लिलावातून हटवण्यात आली आहे. दोन वकिलांनी या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. यातील चार मालमत्ता भूपेंद्र भारद्वाज यांनी, तर दोन मालमत्ता अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली. दाऊदची हवेली वकील श्रीवास्तव यांनी खरेदी केली. ती हवेली ११ लाख २० हजार रुपयांना विकली गेली.

मुंबईत ही लिलाव प्रक्रिया झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये दाऊदची मालमत्ता होती. १३ पैकी सात मालमत्तांचा आज, मंगळवारी लिलाव करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये दाऊदची मालमत्ता होती. १३ पैकी सात मालमत्तांचा आज, मंगळवारी लिलाव करण्यात आला. कुख्यात गुंड दाऊदची मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री केल्यानंतर आज, त्याच्या मूळ गावातील मालमत्तांचा लिलाव करण्यात आला.

‘साफेमा’ने (स्मगलर्स फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर अॅक्ट) एकूण १७ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यातील सात मालमत्ता या एकट्या दाऊदच्या होत्या. रत्नागिरीच्या खेडमध्ये दाऊदच्या एकूण १३ मालमत्ता होत्या. त्यातील सात मालमत्तांचा लिलाव झाला. या संपत्तीची बोली जवळपास ८० लाख रुपये लावण्यात आली होती. दाऊदची मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली होती. मात्र, त्याचा लिलाव करण्यासाठी सरकारला २५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. २०१८मध्ये ‘साफेमा’ने एकेकाळी दाऊदचा दबदबा असलेल्या नागपाड्यातील रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊसची विक्री केली. त्यानंतर दाऊदची बहीण हसीना पारकरचा फ्लॅटचाही यंत्रणेने लिलाव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments