Tuesday, March 18, 2025
Homeआरोग्यविषयकअहिंसा आणि अन्नदान हा मुलमंत्र जैन धर्मियांचा आदर्श- युवाचार्य भगवंत प. पु....

अहिंसा आणि अन्नदान हा मुलमंत्र जैन धर्मियांचा आदर्श- युवाचार्य भगवंत प. पु. महेंद्रऋषीजी महाराज साहेब

भगवान महावीर जैन भोजनशाळेचे चिंचवडमध्ये लोकार्पण

अहिंसा आणि अन्नदान या भगवान महावीर यांनी दिलेल्या वचनाचे आचरण करीत जैन धर्मियांनी देशभरातील नागरिकांना आदर्श घालून दिला आहे. या मुलमंत्राचे पालन करीतच चिंचवड गावात जीतो चिंचवड पिंपरी चॅप्टर व जैन विद्या प्रसारक मंडळाने सुरु केलेली ही जैन सात्विक भोजनशाळा इतर सर्व संस्थांना आदर्श ठरेल. हि सेवा चिरंतन सुरु राहण्यासाठी समाजातील इतर दानशुर व्यक्तींनी देखिल खारीचा वाटा उचलावा. भगवान महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसा परमोधर्म या वचनाचे आचरण करणा-या सकल जैन समाजासाठी आजचा भोजनशाळेचा सोहळा हा परमोच्च क्षण आहे. असाच सेवा उपक्रम इतर शहरात देखिल सकल जैन संघांनी सुरु करावा या सेवेमध्ये सहभाग घेणा-यांना दैवी आनंद आणि समाधान मिळेल असे शुभ आर्शिवाद युवाचार्य भगवंत प. पु. महेंद्रऋषीजी महाराज साहेब यांनी दिले.

जीतो चिंचवड पिंपरी चॅप्टर व जैन विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने चिंचवड गाव येथे ‘भगवान महावीर जैन भोजनशाळेचे’ लोकार्पण बुधवारी (दि. 17 नोव्हेंबर) युवाचार्य भगवंत प. पु. महेंद्रऋषीजी म. सा., प. पु. उप प्रवर्तिनी सन्मतिजी म. सा. आदी ठाणा यांच्या उपस्थितीत चिंचवडगावतील चापेकर चौकाजवळील जीवराजजी भवन येथे लोकार्पण करण्यात आले. सकस, सात्विक व शुद्ध आहार मिळावा, कोणीही व्यक्ती भुकेवाचून वंचीत राहू नये या संकल्पनेतुन ही भोजनशाळा सुरू करण्यात आली आहे. यावेळी जितोच्या रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार राजेंद्र जैन, चिंचवड पिंपरीचे जितो अध्यक्ष संतोष धोका, जैन विद्या प्रसारक मंडळाचे सह सचिव राजेश सांकला, विजय भंडारी, रमेश गांधी, इंदर छाजेड, इंदर जैन, पंकज कर्नावट, संगीता ललवाणी जैन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव राजेंद्र मुथा, प्रकाश चोपडा, सुमतीलाल ओस्तवाल तसेच इतर विश्वस्त व सभासद यांच्यासह सकल जैन संघाचे अशोक पगारिया, अशोक बागमार, दिलीप नहार, जवाहर मुथा, संतोष कर्नावट, प्रकाश गादीया, दिलीप चोरडिया, महेंद्र गंगवाल, मोहनलाल ओसवाल आदी उपस्थित होते,

या भोजनशाळेसाठी राजेंद्र जैन, दिलीप सोनिगरा, राजु मुथा, संतोष धोका, अशोक बाफना, सुनीता देसरडा यांनी विशेष योगदान दिले. नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जैन विद्या प्रसारक मंडळाचे सह सचिव राजेश सांकला यांनी भोजनशाळेची माहिती दिली. या भोजनालयात शुध्द शाकाहारी, जैन सात्विक भोजन अल्पदरात मिळणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत (सुर्यास्तापर्यंत) भोजनशाळा सुरु असेल. शहरातील सकल जैन संघाने एकत्रित पणे भोजन शाळा सुरू केली आहे. मनीष ओसवाल, नेमीचंद ठोले, अर्चना चोरडिया, पूनम बंब यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य दिले. स्वागत राजेंद्र जैन, प्रास्ताविक संतोष धोका, सुत्रसंचालन सोनाली बागमार आणि आभार तृप्ती कर्नावट यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments