Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीमंत्रीमंडळ बदल नको, तर केंद्र सरकारच बदलणे गरजेचे- सचिन साठे

मंत्रीमंडळ बदल नको, तर केंद्र सरकारच बदलणे गरजेचे- सचिन साठे

१० जुलै २०२१,
महागाई व इंधन दरवाढी विरोधात पिंपरी मध्ये कॉंग्रेसची सायकल रॅली, रोज वाढणारे इंधनदर त्यामुळे वाहतूक खर्च वाढत आहेत. वाढणा-या वाहतूक खर्चामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. ह्या महागाईमुळे देशभरातील नागरीकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे. नागरीकांच्या या विरोधाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून केंद्रिय मंत्रीमंडळात मोदींनी फेरबदल करुन माध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रीमंडळात फेरबदल करुन उपयोग नाही, तर केंद्र सरकारच बदलणे गरजेचे आहे. अशी आता सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने शनिवारी (दि. 10 जुलै) शहर कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून महागाई व इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत निषेधात्मक सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी साठे बोलत होते. या रॅलीमध्ये माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, सतिश भोसले, ज्येष्ठ नेते किसनराव भालेकर पाटील, तानाजी काटे तसेच मयूर जयस्वाल, चंद्रशेखर जाधव, शोभा पगारे, बाबा बनसोडे, सज्जी वर्की, शहाबुद्दीन शेख, सुनिल राऊत, विशाल कसबे, कुंदन कसबे, अक्षय शहरकर, गुंगा क्षिरसागर, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, मकर यादव, लक्ष्मण रुपनर, विश्वनाथ खंडाळे, अनिरुध्द कांबळे आदींनी सहभाग घेतला. रॅलीचा समारोप वल्लभनगर येथिल यशवंतराव चव्हाण पुतळ्यासमोर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments