11 November 2020.
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुशील कुमार मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर (एनडीए) विश्वास ठेवल्याबद्दल बिहारच्या जनतेचे आभार मानले.
ते म्हणाले की, भारतीय राजकारणात असे खूप कमी मुख्यमंत्री आहेत ज्यांच्यावर लोकांनी चौथ्यांदा विश्वास ठेवला आहे.
चौथ्यांदा त्यांनी एनडीएवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो.हे खूप महत्वाचे आहे.
भारतीय राजकारणात असे खूप कमी मुख्यमंत्री आहेत ज्यांच्यावर लोकांनी चौथ्यांदा विश्वास दाखवला असेल.
त्यांनी एनडीएला स्पष्ट कौल दिला आहे,यात कोणताही गोंधळ नाही, असे उपमुख्यमंत्री ह्यांनी वृत्तवाहिनी एएनआयशी बोलताना सांगितले.