Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीनिरमा पावडरच्या जाहिरातीमुळे अभिनेता अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात, शिवप्रेमी संतापले

निरमा पावडरच्या जाहिरातीमुळे अभिनेता अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात, शिवप्रेमी संतापले

७ जानेवारी २०२०,
निरमाची जाहिरात करुन अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे असा आरोप आता त्याच्यावर होतो आहे. निरमाच्या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात येत असून याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी आता शिवप्रेमी करत आहेत.निरमा पावडरच्या एका जाहिरातीमुळे अभिनेता अक्षय कुमार हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

जाहिराती काय आहे ?
निरमा पावडरच्या या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर मावळे लढाई करुन दरबारात परतलेले असतात. त्यावेळी सुवासिनी त्यांचे औक्षण करतात. एक महिला मात्र त्यांच्या युद्धात मळलेल्या, खराब झालेल्या कपड्यांवर भाष्य करते आणि हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील असे म्हणते. ज्यानंतर अक्षय कुमार म्हणतो, ” महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी!” आणि त्यानंतर अक्षय कुमार आणि त्याच्यासह सगळे मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत. मात्र हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आहे या प्रकरणी अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

अक्षय कुमार आपले सामाजिक कार्य चांगले आहेत..आपल्या कडून आशा अपेक्षा नव्हत्या, मावळ्यांचे वेशभूषा करून तुम्हाला महाराज नाव घेऊन जय घोष उच्चार घेऊन हे असलं पैशासाठी निरम्याची जाहिरात केली आमची मन दुःखली..ही जाहिरात बंद करा.असे सोशल मीडिया वर नेटकरी प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments