निमाची(नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा काल ग्रँट एक्झॉटिका हॉटेलमध्ये पार पडली .नूतन कार्यकारिणी २२-२४ या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली .मावळते निमा पदाधिकारी व निमा वुमन्स फोरम चे पदाधिकारी गेली चार वर्षे अत्युच्च शिखरावर निमाला घेऊन गेले याबाबत सर्वांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले .रक्तदान शिबीर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद ,निमा गार्डन लढा, निमा अमृतमहोत्सव असे उल्लेखनीय कार्याबद्दल सगळ्यांनी प्रशंसा केली.
.नूतन कार्यकारिणी याप्रमाणे अध्यक्ष डॉ. प्रताप सोमवंशी ,सचिव डॉ. रमेश केदार ,कोषाध्यक्ष डॉ भाऊसाहेब वाघमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी याप्रमाणे डॉ. संतोष भांडवलकर, डॉ. किशोर महाजन, डॉ. अभय तांबिले, डॉ. धनंजय पाटील, डॉ. अमृत पेरणे ,डॉ. नीलेश वाघमारे ,डॉ. सुनील भोये, डॉ. सुशील सिंघवी ,डॉ. प्रशांत बंब ,डॉ. प्रसाद काटे, डॉ. अभिजीत आग्रे ,डॉ. नीलेश लोंढे, डॉ. सुभाष निकम .वीस टक्के महिला आरक्षण म्हणजे चार महिला प्रतिनिधी डॉ. अर्चना शिंदे ,डॉ. सारिका भोईर , डॉ. अंजली आवटे डॉ शिल्पा स्वार यांचीही नूतन कार्यकारिणीत महिला सदस्य म्हणून निवड झाली .
त्याचबरोबर निमा वुमन्स फोरमच्या पदाधिकार्यांची ही बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली.अध्यक्षा डॉ.जबीन पठाण, सचिवा डॉ. प्रतिभा लबडे, कोशाध्यक्षा डॉ. संगीता गायकवाड .उपाध्यक्षा डॉ. मयूरी मोरे, डॉ हेमा चंद्रशेखर , सहसचिव डॉ.रोहिणी बऱ्हाणपुरे- ठाकूर
निमा वुमन्स फोरमची नूतन कार्यकारिणी याप्रमाणे…
डाँ.स्मिता पाटील ,डाँ. आदींति तांबिले, डाँ.अर्चना घाडगे डाँ.सायली वळसंगकर ,डॉक्टर चंचला केदार ,डॉ ज्ञानेशा देसाई,डाँ.स्नेहल लांडगे, डॉ.स्वप्ना डांग माळी ,डॉ सोनाली काटे . डॉ.लत्ता जानगुडे , डॉ शीतल राऊत डॉ सारिका लोंढे ,डॉ मृणाल कुंडले
या सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झालि. नूतन अध्यक्ष डॉ प्रताप सोमवंशी यांनी आयुर्वेदाची नॅशनल कॉन्फरन्स, निमा भवन ,इंटिग्रेटेड प्रॅक्टिस करणार् या डॉक्टरांच्या कायदे व शासनाच्या अमेंडमेंट याचे बुकलेट प्रकाशित करण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असे याप्रसंगी उद्गगार काढले .
ज्येष्ठ सदस्य डॉ प्रमोद कुबडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम अतिशय चोख पार पाडले . मावळते अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव डॉ अभय तांबिले व खजिनदार डाँ.सुनील पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .