Tuesday, June 9, 2026
Homeताजी बातमीरात्रीच्या मेट्रो खोदकामाने निगडी परिसरात नागरिकांना मनस्ताप; गोंगाटाने परिसर अस्वस्थ

रात्रीच्या मेट्रो खोदकामाने निगडी परिसरात नागरिकांना मनस्ताप; गोंगाटाने परिसर अस्वस्थ

निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या मुंबई–पुणे महामार्गावरील निगडी बस स्टॉप परिसरात जोरात सुरू असून, पोकलँड मशीनच्या सहाय्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे काम रात्रीच्या वेळेत सुरू असल्याने परिसरात प्रचंड गोंगाट होत असून नागरिकांना तीव्र त्रास सहन करावा लागत आहे.

या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच विद्यार्थी वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने या गोंगाटाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात नागरिकांनी 112 क्रमांकावर तक्रार दाखल केली असून पोलीस कंट्रोल रूम आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडेही लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.

निगडी बस स्टॉप परिसरातील मेट्रो प्रकल्पाचे रस्ते खोदण्याचे काम रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत बंद ठेवावे, जेणेकरून नागरिकांना होणारा विनाकारण त्रास टाळता येईल, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत, तर मेट्रो प्रकल्पाच्या कामाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments