नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने पुणे ISIS मॉड्युल प्रकरणातील चार वाँटेड आरोपींची माहिती शेअर करणाऱ्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे. वॉन्टेड आरोपींवर प्रत्येकी तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोहम्मद शाहनवाज शफीउज्जमा आलम उर्फ अब्दुल्ला, रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान यांचा समावेश असलेल्या चार आरोपींवर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. इन्वेस्टीगेशन एजन्सीने सांगितले की, आरोपींची माहिती शेअर करणाऱ्या लोकांची माहिती गुप्त ठेवण्यात येईल.
यापूर्वी एनआयएने महाराष्ट्रात बंदी घातलेली दहशतवादी संघटना ISIS च्या विचारसरणीचा प्रचार आणि लोकांची भरती केल्याच्या आरोपाखाली पुणे आणि ठाण्यातील पगडा येथून अनेकांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले होते. याप्रकरणी तपास यंत्रणेने पुण्यातील कोंढवा येथून एका डॉक्टरला अटक केली होती .