२८ ऑक्टोबर २०२०,
बुधवारी बिहार विधानसभा निवडणूक २०२० साठी पहिल्या टप्प्यात मतदान सुरू आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दोघांनीही आज बिहारमध्ये सभांना हजेरी लावलीय. दोघंही आपापल्या पक्षाचे ‘स्टार कॅम्पेनर’ म्हणून बिहारच्या भूमिवर आपापली ताकद आजमावत आपल्या उमेदवारांसाठी मतांची मागणी करत आहेत. राहुल गांधी यांनी पश्चिम चंपारणमध्ये रॅली काढून महाआघाडीच्या उमेदवारांसाठी मतांचं आवाहन जनतेकडे केलंय. याच दरम्यान दुसरीकडे पंतप्रधान त्यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री
नितीश कुमार यांच्यावरही टिप्पणी केली.
राहुल गांधी यांनी एनडीए नेत्यांवर खोटं बोलण्याचा आरोप केलाय. ‘आपल्यात एक कमतरता आहे, आणि ती म्हणजे आपण खोटं बोलू शकत नाहीत. त्यांच्यासमोर खोटं बोलण्यात आपण त्यांचा हात धरू शकत नाहीत’ असं म्हणत राहुल गांधींनी एनडीएवर निशाणा साधला.

याच दरम्यान स्टेजच्या खाली बसलेल्या उपस्थितांपैंकी ‘पकोडे… पकोडे’ करत वडे तळण्याच्या पंतप्रधानांच्या ‘रोजगारा’ची आठवण करून दिली. यावर, आपलं भाषण मध्येच थांबवत त्या व्यक्तीला उद्देशून म्हटलं ‘तुम्ही वडे बनवलेत का कधी? पुढच्या वेळेस आले तर वडे बनवून मोदी आणि नितीश यांना खाऊ घाला’ असं राहुल गांधींनी म्हटलं.
यासोबतच या भाषणा दरम्यान राहुल गांधींनी रोजगाराच्या मुद्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या मुद्यावरन पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत मजुरांची झालेल्या दुर्दैशेचीही आठवण यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थितांना करून दिली. ‘नरेंद्र मोदींनी मजुरांना पायीच पळण्यासाठी भाग पाडलं’ असा घणाघात केला.
तसंच कृषी कायद्याचा उल्लेख करताना, शेतकऱ्यांनी या कायद्यांना केलेला विरोध म्हणून पंजाबमध्ये यंदा दसऱ्याच्या निमित्तानं अनेक ठिकाणी रावणाच्या ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळण्यात आल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. ‘पंतप्रधानांचा पुतळा अशा पद्धतीने जाळला जाणं योग्य नाही. हे पाहून मला अत्यंत दु:ख झालं. परंतु, शेतकऱ्यांना असं कृत्य केलं कारण ते दु:खी आहेत’ असं म्हणत राहुल गांधींनी शेतकऱ्यांचा कैवार घेतलाय.