Monday, July 15, 2024
Homeमुख्यबातम्याजेजूरी देव संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष अनिलजी सौंदडे यांचा पिंपरी चिचवड डिजिटल मिडीया...

जेजूरी देव संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष अनिलजी सौंदडे यांचा पिंपरी चिचवड डिजिटल मिडीया तर्फे विशेष सत्कार

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्रीमार्तंड देव संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अनिल रावसाहेब सौंदडे यांची नुकतीच निवड झाली. या निमित्त्ताने पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, डिजिटल मीडिया संघाच्या वतीने प्रमुख विश्वस्त मा. अनिल रावसाहेब सौंदडे यांचा विशेष सत्कार समारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिका भा.वी.कांबळे पत्रकार कक्षात ठेवण्यात आला होता. 

यावेळी जेष्ठ पत्रकार मा. बाळासाहेब ढसाळ , पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, महिला अध्यक्ष अर्चना मेंगडे , पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे प्रवक्ते अविनाश कांबीकर, भाऊसाहेब आढागळे, अनिल भालेराव, राम बनसोडे, गौरव साळुंखे आणि इतर पत्रकार बांधव उपस्थित होते. 

यावेळी सत्कार करताना जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ म्हणाले की, बहुजनासाठी ही अभिमानची गोष्ट आहे की अनिल सौंदडे यांच्या रुपाने बहुजन समाजातील व्यक्तीला  प्रथमच जेजूरी सारख्या देव संस्थानच्या अध्यक्षपदी  काम करण्याची संधी मिळाली, अनिल सौंदडे हे पिंपरी चिंचवडचे रहिवाशी आहेत, त्यांनी चंपाषष्ठी निमित्त सांगली जिल्हात ८ तालूक्यातील ८० गावातून मल्हारी मार्तंड खंडोबा रथ यात्रेचे यशस्वी आयोजन केले होते तसेच जेजुरी संसथानच्या माध्यमातून चाफेकर हायस्कूल मधील विद्यार्थांना शैक्षणिक मदत देखील केली होती.

संपुर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात,भाविकांना सेवासुविधा देण्यासाठी कटिबध्द आहोत, जेजूरी गडाच्या तिर्थक्षेत्र आराखाड्यातील कामे दर्जेदार व्हावेत यासाठी मी नेहमीच कटिबध्द राहील असे नवनियुक्त अध्यक्ष अनिल सौंदडे यांनी सांगितले. 

यावेळी सत्कार करताना सन्मान चिन्ह, शाल व पुस्तक भेट देऊन अनिलजी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी प्रास्ताविक अविनाश कांबीकर यांनी केले तर आभार प्रशांत साळुंखे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments