२७ जानेवारी २०२०,
काल दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत चिंचवड पोलीस ठाणे अंकित चिंतामणी चौकाजवळ वाल्हेकरवाडी पोलीस चौकीचे उदघाटन होऊन लोकार्पण झाले.या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती च्या वतीने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचा अभिनंदनपर सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शेवाळे,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे,गणेश आटवे, पोलीस हवालदार मारुती कडू,पोलीस नाईक रवींद्र पवार, पोलीस शिपाई सुरेश उबाळे यांना भगवतगीता व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे म्हणाले,”समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाल्हेकरवाडी येथे पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी होती.त्या कारणास्तव समितीच्या वतीने मुंबई मंत्रालय महाराष्ट्र शासन येथे पत्रव्यवहार केला गेला होता.दाट लोकवस्ती असल्याकारणाने चिंतामणी चौक या मध्यवर्ती ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आलेली आहे. नागरिकांच्या तक्रारी व समस्या निवारण्याकरिता सद्यस्थितीत ६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. नवीन चौकीमुळे नागरिकांना गुन्हेनिवारणासाठी त्वरित मदत होणार आहे.”
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” यापूर्वी चिंचवड पोलीस ठाण्याचे अंतर थोडे दूर असल्याने वाल्हेकरवाडीच्या नागरिकांना पायपीट करावी लागत होती, आता नवीन पोलीस चौकीमुळे सामान्य नागरिकांची पायपीट बंद होणार आहे.कायदा आणि सुव्यवस्था त्यामुळे चोख राखली जाणार आहे.पोलीस व रहिवाशी नागरिकांच्या मदतीकरिता समितीचे पोलीस मित्र तत्पर असतील.”
या प्रसंगी समितीचे प्रमुख पदाधिकारी विजय मुनोत,दाजीपाटील क्षीरसागर, गोपाळ बिरारी,महिला अध्यक्षा अर्चना घाळी दाभोळकर, देवयानी पाटील,सतीश देशमुख,लक्ष्मण इंगवले,तुकाराम दहे,अविनाश खंबायत तेजस सापरिया,अमित चौहान,अभिजीत राजे पाटील,तुषार शेंडकर,दीपक बहिरट,अमित डांगे,संतोष चव्हाण,अमोल कानु,भरत उपाध्ये,राम सुर्वे,संदीप सकपाळ,मंगेश घाग,एकनाथ सरोदे,श्रेयस सरोदे,सुरेश गावडे,दिलीप शिंदे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब घाळी यांनी केले. आभार प्रदर्शन गौरी सरोदे यांनी केले.