दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचीच चलती आहे. मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आलेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण आदिपुरुषसारख्या बिग बजेट सिनेमाला दणकून पाडत मराठी सिनेमानं नाव कमावलं आहे. एकामागोमाग एक मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. काही काळापूर्वी आलेल्या रावरंभा, महाराष्ट्र शाहीर या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण आता आलेल्या एका चित्रपटानं मात्र रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’.
दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 30 जून रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. नुकतंच या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला किती कमाई केली, याचा आकडा समोर आला आहे. केदार शिंदे यांनी एक पोस्ट करत चित्रपटाच्या कमाईविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.
केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला किती कमाई केली याची माहिती दिली आहे. मोठी स्टारकास्ट असलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला 6.45 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे. यानिमित्ताने केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.’मिस्टर शाह