Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीCJI : एन.व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती कोविंद यांनी दिली मंजुरी

CJI : एन.व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती कोविंद यांनी दिली मंजुरी

सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांची भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ एप्रिल अखेरीस संपत असून बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमण यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

रमण यांची भारताचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, २४ एप्रिल रोजी ते पदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत असणार आहे. सोळा महिने रमण सरन्यायाधीशपदी असणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया मार्चमध्येच सुरू केली होती. केंद्र सरकारने सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवलं होतं.

६४ वर्षीय रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. पोन्नावरम हे गाव आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात येते. रमण यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरूवात केली. न्यायमूर्ती रमण यांचं बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments