Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीभारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मनोज नरवणे यांची निवड

भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मनोज नरवणे यांची निवड

१७ डिसेंबर
महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मराठी न्यायाधिशानंतर आता लष्करप्रमुख म्हणून पुण्याच्या मनोज नरवणे यांची निवड झाली आहे, सप्टेंबर महिन्यातच उपलष्करप्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. आता लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत.नरवणे पुणेकर असल्याने पुण्यासाठी हा अभिमानाचा विषय ठरला आहे.या पूर्वी पुण्याचे जनरल अरुणकुमार वैद्य यांनी लष्करप्रमुखपद भूषवले होते.नरवणे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील.

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी असलेल्या मनोज नरवणे यांनी १९८० मध्ये शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७ व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. मनोज नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. त्यांना आतापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments