नीट यूजी २०२२ देणाऱ्या परीक्षार्थींसाठी महत्वाची अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) कडून नीट यूजी २०२२ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. नीट यूजी २०२२ परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना विद्यार्थी प्रवेशपत्राची वाट पाहत होते.
एनटीएने यापूर्वीच नीट यूजी उमेदवारांसाठी २८ जून २०२२ रोजी अधिकृत वेबसाइटवर परीक्षा सिटी स्लिप जाहीर केली आहे. नीट प्रवेशपत्र जाहीर केल्यानंतर, उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट -neet.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकतील.
NEET UG Admit Card: असे करा डाऊनलोड
नीट एनटीएची अधिकृत वेबसाइट https://neet.nta.nic.in/download-admit-card/ जा. होमपेजवर, ‘नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करा’ लिंक वर क्लिक करा, एक नवीन पेज खुले होईल. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा. तुमचे नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.