National Eligibility Cum Entrance Test पदव्युत्तर आणि पदवीपूर्व Counselling (समुपदेशना) साठी नोंदणी १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. समुपदेशनासाठी निश्चित केलेली तारीख एमसीसीने अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, MCC (Medical Counselling Committee) च्या वतीने लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल असा अंदाज आहे. त्यामुळे, उमेदवारांनी NEET UG समुपदेशन तारखांच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
NEET UG गुणांच्या आधारे केंद्र सरकारकडून अखिल भारतीय कोट्यातील १५ टक्के जागांसाठी समुपदेशन आयोजित केले जाते. तर ८५ टक्के जागांसाठी समुपदेशन संबंधित राज्यांच्या प्राधिकरणाद्वारे केले जाते. राज्य आणि केंद्र शासन आपापल्या योग्यतेनुसार आणि नियम व अटींनुसार कोट्यातील जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करेल. १६ जूनला एआयक्यू (AIQ)ने जागांसाठीची गुणवत्ता यादी जाहीर केली होती.
या जागांसाठी पात्रतेनुसार अर्जदारांना NEET PG समुपदेशनामध्ये सहभागी होण्यासाठी MCC वेबसाइटवर नोंदणी करणे अनिवार्य असेल. अर्जदारांना त्यांचे पूर्ण नाव, जन्मतारीख, NEET PG 2023 अर्ज क्रमांक आणि इतर तपशील प्रविष्ट करून ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. NEET UG 2023 परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना MBBS, BDS सह इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. यावेळी उत्तर प्रदेशातील सर्वाधिक उमेदवार NEET मध्ये यशस्वी झाले आहेत. तर राजस्थान आणि महाराष्ट्र ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
AIQ किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये (केंद्रीय विद्यापीठ) प्रवेश घेण्यासाठी, सामान्य प्रवर्गतील अर्जदारांना १ हजार रुपये, तर SC आणि ST प्रवर्गातील अर्जदारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर, डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये (Deemed University) प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना ५ हजार रुपये भरावे लागणार. NEET PG सीट वितरणासाठी प्रवेशकर्त्यांनी त्यांच्या पसंती आणि गुणवत्तेवर आधारित अभ्यासक्रम आणि अभ्याक्रमांची निवड करणे गरजेचे आहे.