Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीपेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन…

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन…

३ जूलै २०२१,
केंद्र सरकारमार्फत पेट्रोल, डिझेल आणि गॅसची सतत दरवाढ होत असल्याने या दरवाढीच्या निषेधार्थ आज पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चुलीवर भाकरी करून निषेध नोंदविला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धोरण मोदींचे; मरण सर्वसामान्यांचे, मोदीजी, नही चाहिये अच्छे दिन; लौटा दो हमारे बुरे दिन, वाढलेला गॅस कोंडतोय सर्वसामन्यांचा श्वास, असे फलक घेऊन आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. या दरवाढीचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनावर होत आहे. यामुळे सर्वांचे जगणे मुश्किल झाले असून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही चुलीवर भाकरी करून निषेध नोंदविला आहे. या आंदोलनाची दखल सरकारने घ्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला.

मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये जून महिन्यातील १६ वी दरवाढ नोंदवण्यात आली. पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे आणि करोनाकाळातील लॉकडाऊनमुळे जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबादसह महत्त्वाच्या शहरात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस इंधन दरवाढीवरुन केंद्रासह राज्यातील विरोधी पक्षनेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत.

मंगळवारी मुंबईसह ६ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ३४ पैसे, तर डिझेल लिटरमागे ३० पैशांनी वाढले आहेत यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने याची आकडेवारी ट्विट केंद्र सरकारवर टीका केली होती. देशात पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. आज जून महिन्यातील १६ वी दरवाढ नोंदविण्यात आली. पेट्रोलच्या दरात प्रती लिटर ३५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रती लिटर २८ पैशांची दरवाढ करण्यात आली आहे असे ट्विटमध्ये म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments